धनुष्यबाण कोणाचा ठाकरेंचा कि शिंदेंचा, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय.

0
161

मुंबई, दि. 12 (पीसीबी)-शिवसेना पक्षाचं नाव व चिन्ह धनुष्यबाण नेमका कोणाला मिळणार याबाबत आज निवडणूक आयोगापुढे सुनावणी पार पडली आहे. राज्यात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षानंतर शिवसेना पक्षात फूट पडली होती. बंडखोर शिंदे गटाने शिवसेनेवर हक्क सांगितल्याने व शिंदे गटाकडे बहुमत असल्याने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे पाठवल्याने पक्ष चिन्हावर निवडणूक आयोग निर्णय देणार यावर शिक्कामोर्तब झालं होत. 

आज याच प्रकरणावर निवडणूक आयोगापुढे सुनावणी पार पडली असून निवडणूक आयोगाने आज कुठलाही निर्णय दिलेला नाही. या प्रकरणात आता पुढची सुनावणी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे वरिष्ठ नेते अनिल देसाई यांनी या संदर्भात प्रसारमाध्यमांना अधिकची माहिती दिली आहे. 

देसाई म्हणाले आहेत की, “आज निवडणूक आयोगापुढे सुनावणी पार पडली, आज आम्हाला या संदर्भात काही ठोस निर्णयाची अपेक्षा होती. मात्र निवडणूक आयोगाने या प्रकरणात आणखी काही पुराव्यांची व कागदपत्रांची मागणी केली. या प्रकरणावर पुढची सुनावणी जानेवारी महिन्यात होणार असून आम्ही त्यासाठी तयार असणार आहोत..”