धक्कादायक ! घुसखोर निघाला बॉम्ब स्फोटातील आरोपी

0
339

पुणे, दि. १८ (पीसीबी) – पुणे पोलिसांनी अटक केलेला बांगलादेशी घुसखोर कमरूल मंडल आहे बांगलादेशातील बॉम्ब स्फोटाच्या गुन्ह्यातील आरोपी. बेनापोल, बांगलादेश येथे हात बॉम्ब टाकले प्रकरणी त्याला अटक झाली होती. जामिनावर सुटल्यानांत विनापरवाना भारतात प्रवेश करून मंडलने पुण्यातून भारतीय पासपोर्ट मिळवले

हडपसर पोलिसांनी दिली न्यायालयात माहिती.

याच कमरूल मंडलला १५ ऑगस्ट, २०२१ रोजी अन्य सहा संशयित बांगलादेशी घुसखोरांसह हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावेळी आपण बांगलादेशी आहोत हे संशयितांनी सांगितले, तशी स्टेशन डायरी नोंदही झाली, परंतु विशेष तपास न करता पोलिसांनी सर्वांना सोडून दिले होते.

पुन्हा Military Intelligence ने लक्ष घातल्यावर हडपसर पोलिसांनी मंडलसह बेकायदेशीर वास्तव्य करणारे ४ बांगलादेशी नागरिक ऑक्टोबर १४ रोजी हडपसर अटक केले, तर एकूण ११ जणांवर गुन्हा दाखल केला. तपासात त्यांना आधार, पॅन कार्ड सारखी भारतीय ओळखपत्र मिळवून देणारा पुण्यातील ‘एजेंट’ पोलिसांना सापडला आहे. पोलिसांनी ‘एजेंट’ कडूनही बांगलादेशी पासपोर्ट जप्त केले आहेत.

अटक बांगलादेशी आरोपी पश्चिम बंगाल येथील बँक अकॉउंट द्वारे बांग्लादेशात पैसे पाठवत असल्याचे तपासात उघड झाले. अंतरराष्ट्रीय धागेदोरे असणाऱ्या रॅकेटचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी न्यालयात सांगितले. न्यायालयाने ५ अटक आरोपीना ऑक्टोबर २३ पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.केंद्रीय तपास यंत्रणांनी गुन्ह्याची माहिती घेतली असून तपासात लक्ष घातले आहे.