देशाच्यातील ४७ बँकांची ३९ हजार कोटींंची फसवणूक

0
204

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) – देशाच्या वेगवेगळ्या भागातील ४७ बँकांमध्ये १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान ६४ हजार ८५६ आर्थिक फसवणुकींचे प्रकरण नोंदवले गेले. त्यात या बँकांची ३९ हजार ६९८ कोटी ३७ लाख रुपयांनी फसवणूक झाल्याचे माहितीच्या अधिकारातून समोर आले आहे.

“अध्यक्षांना धमकी देणं खपवून घेणार नाही”, फडणवीसांच्या आरोपावर भास्कर जाधव म्हणाले, “नाना पाटेकरांनी…”
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय जन सूचना अधिकारी अभय कुमार यांनी सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांना दिलेल्या माहितीनुसार, देशभरात सरकारी व खासगी बँका, वित्तीय संस्था अशा एकूण ४७ बँकांमधील ही माहिती आहे. या सगळ्या बँकांमध्ये १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान फसवणुकींचे ६४ हजार ८५६ प्रकरण घडले. त्यात बँकांची ३९ हजार ६९८ कोटी ३७ लाख रुपयांनी फसवणूक झाली. यापैकी काही तक्रारी लोकपाल आणि सीईपीसी या संस्थेद्वारेही प्राप्त झाल्या. बँकांमधील फसवणुकीची सर्वाधिक १८ हजार ३३० प्रकरणे कोटक महिंद्रा बँक लि. मधील आहेत. या बँकेची ११८.६५ कोटी रुपयांनी फसवणूक झाली.

ॲक्सिस बँक लि.ची ६ हजार ८४२ प्रकरणांमध्ये ६३०.६९ कोटी रुपयांनी, एचडीएफसी बँक लि.ची २ हजार ६०८ प्रकरणांमध्ये ३०६.४० कोटींनी, आयसीआयसीआय बँक लि.ची ४ हजार ४२४ प्रकरणांमध्ये ६४५.८७ कोटी रुपयांनी, इंडूसलॅन्ड बँक लि.ची ५ हजार १८४ प्रकरणांमध्ये २२६.४३ कोटी रुपयांनी, आरबीएल बँक लि.ची ८ हजार ३५९ प्रकरणांमध्ये ३३१.५५ कोटी रुपयांनी, स्टॅंडर्ड चार्टर्ड बँकेची २ हजार ८९० प्रकरणांमध्ये ५१२.०८ कोटी रुपयांनी, स्टेट बँक ऑफ इंडियाची २ हजार ८७७ प्रकरणांमध्ये ५ हजार ५२७.४४ कोटी रुपयांनी फसवणूक झाली आहे. इतरही बँकांची कमी अधिक प्रमाणात फसवणूक झाल्याचे माहितीच्या अधिकारातून पुढे आले आहे.