दुचाकीवरील चोरट्याने महिलेचे गंठण हिसकावले

0
407

चिखली, दि. ७ (पीसीबी) – पादचारी महिलेचे 60 हजारांचे गंठण दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना बुधवारी (दि. 5) रात्री महात्मा फुले नगर, चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील दोन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या घरासमोर राहणाऱ्या महिलेसोबत बुधवारी रात्री सव्वादहा वाजता चालत जात होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरून दोन चोरटे आले. त्यातील एका चोरट्याने फिर्यादी यांच्या गळ्यातील 60 हजारांचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसकावून चोरून नेले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.