‘पीएमआरडीए’च्या घरकुल योजनेस अर्ज करण्यासाठी 18 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

0
176

पिंपरी दि. ८ (पीसीबी) –  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)च्या  प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ईडब्ल्यूएस गटाकरिता पेठ क्रमांक 12 येथे उभारण्यात येत असलेल्या गृहप्रकल्पाकरिता अर्ज करण्यास 18 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयाने पेठ क्रमांक 12 येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ईडब्ल्यूएस गटाकरिता (अनुसूचित जमाती) 29 सदनिका व विमुक्त जाती (डीटी) करिता दोन सदनिका अशा 31 सदनिका, एलआयजी प्रवर्गातील 793 सदनिका व पेठ क्रमांक 30-32 येथील ईडब्ल्यूएस (वन आरके) प्रवर्गातील 366 सदनिका व एलआयजी (वन बीएचके) प्रवर्गातील 414 सदनिकांचा सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांचा भव्य प्रकल्प साकारण्यात येणार आहे. या गृहप्रकल्पांसाठी अर्ज करण्याची मुदत 3 ऑक्टोबर रोजी संपुष्टात आली होती. नागरिकांच्या मागणीनुसार त्यात वाढ करण्यात आली आहे.

प्रकल्पातील घरांचा डिसेंबर 2022 पूर्वी ताबा देण्यात येणार आहे. या गृहप्रकल्पातील सदनिकांसाठी इच्छुक नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. त्याची मुदत 3 ऑक्टोबर रोजी संपुष्टात आली. परंतु, नागरिकांच्या विनंतीवरून ही मुदत 18 ऑक्टोबर 2022  पर्यंत वाढविण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता www.pmrda.gov.in व http://lottery.pmrda.gov.in या संकेतस्थळाला दिल्यास अधिक माहिती उपलब्ध आहे, असे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयातर्फे सांगितले आहे. अधिक माहितीसाठी या 02262531727 या हेल्पलाईनवर संपर्क करता येईल.