दिवसाला साडे चार हजारांचे उत्पन्न कमावण्याचे आमिष दाखवून नागरिकाची पाच लाखांची फसवणूक

0
157

दिवसाला साडेचार हजार कमवायचे आमिष दाखवून नागरिकाची सुमारे पाच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा सारा प्रकार 3 ते 6 एप्रिल 2024 या कालावधीत सांगवी येथे ऑनलाईन पद्धतीने घडला आहे.

याप्रकरणी 35 वर्षीय नागरिकाने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून विविध व्हॉटसअप क्रमांक, टेलीग्राम आयडी, तसेच विविध बँक खातेधारकावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना फोनवर मॅसेज पाठवून पार्ट टाईम जॉबची ऑफर देण्यात आली. यावेळी त्यांना दिवसाला 1 हजार 700 ते 4 हजार 500 रुपये कमावण्याचे आमिष दाखविण्यात आले. ऑनलाईन जॉब असल्याचे सांगून त्याला वेगवेगळे टास्क दिले. पुढे त्यांना नफा मिळवण्यासाठी वारंवार वेगवेगळ्या खात्यावर पैस पाठवण्यास सांगून 4 लाख 92 हजार 227 रुपयांची फसवणूक केली होता. यावरून सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.