दिया कुमारी होणार का राजस्थानच्या मुख्यमंत्री?

0
319

नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी)-पाच राज्यांच्या विधानसभांचे निकाल येत आहेत, यामध्ये राजस्थानमध्ये काँग्रेसचा पराभव होणार असल्याचं दिसत आहे. राजस्थानमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली असून भाजप सत्तास्थापनेच्या जवळ पोहोचल्याचं चित्र आहे. अशात आता राजस्थानमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगली आहे. यामध्ये एक नाव सर्वात आघाडीवर आहे ते म्हणजे दिया कुमारी.

राजस्थानमध्ये भाजपची सत्ता येणार असल्याचं चित्र समोर येत असल्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी जी काही पहिली नावं समोर आली त्या नावांमध्ये दिया कुमारी यांचा प्रामुख्याने समावेश आहे. दिया कुमारी या भाजपच्या खासदार आहेत. भाजपने खासदार असतानाही त्यांना यावेळी विधानसभेच्या आखाड्यात उतरवलं आहे. त्यामुळे दिया कुमारी राजस्थानच्या नव्या मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

दिया कुमारी या राजस्थानमध्ये राजकुमारी म्हणून प्रसिद्ध आहेत. जयपूरच्या राजघराण्यातील सवाई भवानी सिंह आणि पद्मिनी देवी यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला, त्या आपल्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहेत. परदेशात शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०१३ साली त्या सवाई माधोपूरमधून आमदार झाल्या. त्यानंतर त्यांनी राजसमंद लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक जिंकली. आता त्या विधानसभेच्या रिंगणात उतरल्या असून त्या विद्याधरनगर जागेवर विजयी देखील झाल्या आहेत.

दिया कुमारी मुख्यमंत्री होण्याबद्दल काय म्हणाल्या?

भाजपच्या विजयाबद्दल पत्रकारांनी दिया कुमारी यांना प्रश्न केला. त्यांना तुम्ही आता राजस्थानच्या मुख्यमंत्री होणार का?, असा सवाल सुद्धा केला. त्यावर त्यांनी थेट बोलणं टाळलं. एवढ्या मोठ्या विजयाची आम्हाला अपेक्षा नव्हती, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावर लोकांनी विश्वास दाखवला, असं दिया कुमारी यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री होणार असल्याच्या प्रश्नाला त्यांनी हा कार्यकर्त्यांना उत्साह आहे. ते फक्त मलाच म्हणत नसतील तर इतरही अनेकांबद्दल असंच बोललं जात असेल, असं दिया कुमारी यांनी म्हटलं आहे. एकप्रकार त्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या विषयावर बोलणं टाळलं आहे.

दरम्यान, राजस्थान भाजपमध्ये वसुंधरा राजे यांच्या नावाची चलती होती, मात्र मोदी-शहा युग आल्यापासून भाजपमध्ये काळ बदलला आहे. अनेक जुन्या नेत्यांना बाजूला केलं आहे. त्याला फक्त काही अपवाद आहेत, मात्र या अपवादांमध्ये