तोंडाच्या कर्करोगाच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेमध्ये आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी अवयव वाचवले, शस्त्रक्रिया केली मोफत

0
234

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) : पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटल या टर्शरी केअर हॉस्पिटलने ओरल कार्सिनोमा (एक प्रकारचा कर्करोग) या गुंतागुंतीच्या व आव्हानात्मक प्रकरणात यशस्वीपणे उपचार केले. प्रगत तंत्रज्ञान व उपचारांनी तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने अवयव वाचविला. सीजीसीएस कॅटेगरीअंतर्गत हे प्रकरण होते. हे उपचार मोफत करण्यात आले. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे आर्थिक ओझे न येता एकाच छताखाली रुग्णाला जागतिक दर्जाचे उपचार मिळाल्याने रुग्णाचे नातेवाईक आनंदी आहेत.

अंजली (नाव बदलले आहे) या 45 वर्षीय महिलेवर आदित्या बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटलमधील ऑन्को सर्जन डॉ. पंकज क्षीरसागर उपचार करत होते. या महिलेला ओरल कार्सिनोमा हा एक प्रकारचा कर्करोग झाला होता. एखाद्या अवयवाची त्वचा किंवा ऊतीचे अस्तर तयार करणाऱ्या पेशींनी याची सुरुवात होते. कार्सिनोमा या असाधारण पेशी असतात. त्या अनियंत्रितपणे विभाजित होतात आणि शरीरातील इतर भागांमध्ये पसरतात. या प्रकारच्या तोंडाच्या कर्करोगासाठी शस्त्रक्रिया हाच उत्तम उपचार असतो.
सामान्यपणे, तोंडाच्या कर्करोगावरील शस्त्रक्रियेनंतर अनेक प्रकारचे व्यंग निर्माण होऊ शकते. तसे झाल्याने रुग्ण कायम नैराश्यात असतो, तो सामाजिक कार्यक्रमांपासून लांब राहतो आणि जीवनमानावर त्याचा परिणाम होतो. रुग्णांच्या चेहऱ्यामध्ये व्यंग निर्माण होते, खाताना व बोलताना कठीण जाते. एका बाजूला, कर्करोग पुन्हा उद्भवू नये यासाठी डॉक्टरांना शस्त्रक्रिया करावी लागते आणि दुसऱ्या बाजूला अवयवामध्ये व्यंग निर्माण होऊ नये या आव्हानाला हाताळावे लागते.

“रुग्ण खूपच घाबरलेल्या होत्या आणि त्यांना चेहऱ्याला येऊ शकणाऱ्या व्यंगाबद्दल खूपच संशय होता. शस्त्रक्रियेनंतर आपण खाऊ शकू का, बोलू शकू का या शंका त्यांना होत्या, त्याचप्रमाणे आपला चेहरा कसा दिसेल, हीसुद्धा चिंता होती. आमच्या ऑन्को टीमने त्यांचे त्यांच्या भाषेत समुपदेशन केले. आम्ही नेमके काय करणार आहोत आणि आजच्या काळात कार्सिनोमा टंग यावर हाच कसा सर्वोत्तम उपचार आहे, हे त्यांना समजावून सांगितले. या उपचारपद्धतीमधील प्रत्येक बारकावा समजून घेतल्यानंतर त्यांनी शस्त्रक्रियेसाठी मंजुरी दिली.”, असे आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटलचे ऑन्को सर्जन डॉ. पंकज क्षीरसागर यांनी सांगितले.

आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये अनुभवी सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि प्लास्टिक सर्जन्सनी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पाडली. या अत्यंत आव्हानात्मक ओरल कार्सिनोमाच्या प्रकरणात अवयवही वाचविण्यात त्यांना यश मिळाले.

“आम्ही जीभेच्या व मानेच्या नोड्सचा पुढचा 2/3 भाग काढला आणि प्लास्टिक सर्जननी रक्तवाहिन्यांसह हाताची त्वचा वापरून ती जीभ पुन्हा सांधली. या त्वचेच्या झडपेचे मानेच्या रक्तवाहिन्यांसह अॅनास्टोमोसिस (संमिलन) (अ‍ॅनास्टोमोसिस म्हणजे रक्तवाहिन्या, पानांच्या शिरा किंवा प्रवाहासारख्या सामान्यतः वळणाऱ्या किंवा फांद्या फुटणाऱ्या दोन गोष्टींमधील जोडणी किंवा मुख) करून नवीन जीभेची रचना केली. यासाठी अत्यंत कौशल्य व मायक्रो व्हॅस्क्युलर अॅनास्टोमोसिसची आवश्यकता असते.”, अशी पुष्टी आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटलचे ऑन्को सर्जन डॉ. पंकज क्षीरसागर यांनी जोडली.

आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटलचे ऑन्को सर्जन डॉ. पंकज क्षीरसागर, आदित्य बिर्ला हॉस्पिटलचे प्लास्टिक सर्जन डॉ. प्रणव ठुसे, भूल विभागाचे प्रमुख डॉ. मोहंती, भूलतज्ज्ञ डॉ. पूजा कुलकर्णी आणि सर्व इतर नर्सिंग व आयसीयू वॉर्ड कर्मचारी व परिचारिका यांच्या प्रयत्नांमुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. शस्त्रक्रियेनंतर अवयव जतन व कार्य या संदर्भात उत्तम परिणाम दिसून आले. त्या बोलू शकतात, सामान्य व्यक्तीप्रमाणे खाऊ-पिऊ शकतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर एकही व्रण नाही आणि कॉस्मॅटिक परिणामही उत्तम साध्य झाले आहेत. शस्त्रक्रियेनंतर सातव्या दिवशी अंजली यांना डिस्चार्ज देण्यात आला.
“डॉक्टर, रेखा दुबे मॅम आणि आम्हाला आर्थिक सहाय्य करणाऱ्या आदित्य बिर्ला हॉस्पिटलमधील सर्वांच आम्ही ऋणी आहोत.”, असे अंजलीचे पती म्हणाले. “मला शस्त्रक्रियेबद्दल समजले तेव्हा मी प्रचंड घाबरलो होतो. पण डॉक्टरांनी माझे समुपदेशन केले. मला संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली, मला धीर दिला. माझे रूप, खाण्याची क्रिया बाधित झालेली नाही, याबद्दल मी कृतज्ञ आहे.”, असे अंजली म्हणाल्या.

“कर्करोगाच्या शस्त्रक्रियेमध्ये आम्हाला श्रेष्ठत्व साध्य करायचे आहे आणि प्रत्येक रुग्णाला कोणत्याही आर्थिक अडथळ्यांशिवाय उत्तम उपचार उपलब्ध झाले पाहिजेत. अंजलीची शस्त्रक्रिया आणि त्यांच्या प्रकृतीमधील सुधारणा पाहून मी अत्यंत आनंदी आहे. इतक्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत आम्ही त्यांचा अवयव वाचवू शकलो याचे मला समाधान आहे.”, आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटलच्या सीईओ रेखा दुबे म्हणाल्या.