‘तुला कोठे जायचे आहे, मी सोडू का’? म्हणत महिलेचा विनयभंग

0
287

भोसरी, दि. ४ (पीसीबी) – ‘तुला कोठे जायचे आहे, मी सोडू का’? असे म्हणत दोघांनी एका महिलेला मारहाण केली. अश्लिल बोलून महिलेची छेड काढली, विनयभंग केला. ही घटना गुरुवारी (दि.2) रोजी पावणेदहाच्या सुमारास नाशिक-पुणे हायवे येथे घडली.

याप्रकरणी 28 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजय यादव कानडे (वय 26, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) आणि सागर मारुती हिवरे (वय 21, रा. दिघीरोड, संत तुकारामनगर) यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.

फिर्यादी नाशिक-पुणे हायवेवरुन जात असताना आरोपी तिथे आले. ‘तुला कोठे जायचे आहे, मी सोडू का’? असे फिर्यादीला विचारले. त्यावर नको दादा म्हणत फिर्यादी दुस-या रिक्षाकडे गेल्या. पुन्हा तिथे जात आरोपींनी ‘मी सोडु का’? असे फिर्यादीला म्हटले. त्यावर फिर्यादी नको म्हणाल्या. तरी, देखील आरोपी ऐकत नव्हते. त्यामुळे फिर्यादीने आरोपीला मारण्यासाठी हात उगरला असता आरोपीने फिर्यादीचा हात जोरात दाबला. त्यामुळे फिर्यादीच्या हाताला खरचटले. त्यानंतर फिर्यादीला लाथ मारली. घाणघाण अश्लिल शब्द बोलून फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न केली. तसेच फिर्यादीचा भाव हात सोडून घेऊ लागला. तर, आरोपींनी भावाला सुद्धा डोक्यात दगड मारुन दुखापत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.