तीन लाखांचे बांधकाम साहित्य पळवले

0
224

सावरदरी, दि. ९ (पीसीबी) – बांधकाम साईटवरून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख 97 हजार रुपये किमतीचे बांधकामाचे साहित्य चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 6) सकाळी खेड तालुक्यातील सावरदरी येथे उघडकीस आली.

अनिलकुमार श्रीधरन पणीकर (वय 50, रा. देहूरोड) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावरदरी गावात रितेश कोठारी यांची बांधकाम साईट सुरु आहे. त्या साईटवर फिर्यादी यांनी सेंट्रिंग प्लेटा, लोखंडी पाईप, शिकंजा असे साहित्य ठेवले होते. बुधवारी (दि. 5) रात्री दहा ते गुरुवारी सकाळी दहा वाजताच्या कालावधीत अज्ञाताने बांधकाम साईटवरील दोन लाख 97 हजारांचे साहित्य चोरून नेले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.