Pune

तीन मोबाईलसह दुचाकी चोरीला

By PCB Author

October 07, 2022

हिंजवडी, दि. ७ (पीसीबी) – खोलीतून चोरट्याने तीन मोबाईल फोन आणि पार्किंग मधून दुचाकी चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 6) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास श्रीराम चौक, मारुंजी रोड, हिंजवडी येथे घडली.

रणजित रवींद्र भोसले (वय 22, रा. श्रीराम चौक, मारुंजी रोड, हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या खोलीतून एका अनोळखी चोरट्याने 50 हजारांचे तीन मोबाईल फोन आणि एक दुचाकी चोरून नेले. ही घटना गुरुवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.