तळेगाव विकास आघाडीचे किशोर आवारे यांच्यावर गोळीबार, गंभीर जखमी

0
498

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – तळेगाव दाभाडे जनविकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर गंगाराम आवारे यांच्यावर आज दुपारी दीडच्या सुमारास भरदिवसा तळेगाव नगरपालिका आवारातच चार गुंडांनी गोळीबार केला. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

कोयत्याने सपासप वार करून चार गोळ्या झाडल्या असे समजले. दरम्यान, गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हा टोळीयुध्दाचाच प्रकार असल्याचे सांगण्यात आले. हल्लेखोर फरार आहेत.