दि 3 एप्रिल (पीसीबी )- डंपरच्या धडकेत दुचाकीवरून जाणाऱ्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. २) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास स्पाईन रोड, चिखली येथे घडला.दिलीप लक्ष्मण घोटकुले (वय ८५, रा. ताथवडे) असे मृत्यू झालेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. निखील दिलीप घोटकुले (वय ३३) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डंपर (एमएच १४/जीयु ४६१७) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील दिलीप घोटकुले हे दुचाकीवरून स्पाईन रोड, चिखली येथून जात होते. पवारवस्ती उड्डाणपुलाजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून एका डंपरने धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर आरोपी घटनास्थळी न थांबता पळून गेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.डंपरच्या धडकेत दुचाकीवरून जाणाऱ्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. २) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास स्पाईन रोड, चिखली येथे घडला.
दिलीप लक्ष्मण घोटकुले (वय ८५, रा. ताथवडे) असे मृत्यू झालेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. निखील दिलीप घोटकुले (वय ३३) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डंपर (एमएच १४/जीयु ४६१७) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील दिलीप घोटकुले हे दुचाकीवरून स्पाईन रोड, चिखली येथून जात होते. पवारवस्ती उड्डाणपुलाजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून एका डंपरने धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर आरोपी घटनास्थळी न थांबता पळून गेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.











































