ट्रॅक्टर अंगावर पलटी होऊन पादचाऱ्याचा मृत्यू

0
351

पुसाणे, दि. १७ (पीसीबी) – ट्रॅक्टरचे चाक रुतून ट्रॅक्टर खड्ड्यात पलटी झाला. त्यात एका पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. १६) दुपारी दोन वाजताच्या सुमारास पुसाणे येथे घडला.

रमण परशुराम चव्हाण (वय ५६) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अजय गोवर्धन पवार (वय ६६, रा. शिवाजीनगर, पुणे. मूळ रा. वाशीम) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रॅक्टर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुसाणे गावात जैन गोशाळेचे काम सुरु आहे. तिथे आरोपी ट्रॅक्टर चालक काम करतो. आरोपी चालक ट्रॅक्टर घेऊन जात असताना एक चाक मातीत रुतून ट्रॅक्टर पलटी झाला. त्यावेळी रमण चव्हाण हे तीथून जात होते. त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर पलटी झाल्याने ते गंभीर जखमी होऊन मयत झाले. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.