ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ . बी .डी कुलकर्णी यांचे निधन

0
330

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ डॉ. बी. डी कुलकर्णी यांचे नुकतेच ( वय वर्षे 83) निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, जावई व नातवंडे असा परिवार परिवार आहे. डॉ. बी. डी. कुलकर्णी यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये प्रोफेसर, विभाग प्रमुख व इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारलेल्या होत्या. त्यांचा अध्ययन, अध्यापन व संशोधनाचा अनुभव 38 वर्ष इतका होता.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली १८ विद्यार्थ्यांनी पीएच.डी प्राप्त केली असून २७ विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. विद्यापीठ अनुदान मंडळाचे संशोधन प्रकल्पही त्यांनी पूर्ण केले. इतकेच नाही तर अर्थशास्त्र विषयावर 22 पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत. शिवाय व्यापारी मित्र, योजना व इतर विविध मासिकांसाठी त्यांनी सातत्याने लिखाण केले. त्याबरोबरच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर शोधनिबंध ही त्यांचे प्रसिद्ध झालेले . अर्थकारण व भारतीय शेती हा त्यांच्या आवडीचा विषय होता. अर्थशास्त्राची मांडणी ते सहज व सोप्या पद्धतीने करण्याची हातोटी त्यांच्याकडे होती. त्यांच्या निधनाने अर्थशास्त्र परिवारामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे .