जेसीबी कंपनीत चोरी; आठ लाखांचे पार्ट चोरीला

0
860

तळेगाव,दि.११(पीसीबी) – तळेगाव एमआयडीसी येथे असलेल्या जेसीबी कंपनीत चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात कामगारांनी कंपनीतून आठ लाख रुपये किमतीचे पार्ट संमतीशिवाय चोरून नेले आहेत. हा प्रकार सप्टेंबर 2023 ते 28 नोव्हेंबर 2023 दरम्यान कंपनीच्या स्टोअर्समध्ये घडला.

याप्रकरणी अमित कुमार (वय 42, रा. वाकड) यांनी 9 डिसेंबर र्रोजी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंपनीतील अज्ञात कामगारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या स्टोअर्स मधून आठ लाख सात हजार 480 रुपये किमतीचे पार्ट चोरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी अमित कुमार हे जेसीबी कंपनीत अधिकारी पदावर काम करत आहेत. कंपनीतील अज्ञात कामगाराने ही चोरी केली असल्याचा त्यांचा संशय आहे. त्यामुळे अज्ञात कामगाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.