जीआयएस प्रकल्पांतर्गत नागरिकांना विविध सेवा मिळणार – आयुक्त शेखर सिंह

0
204

– शहर सल्लागार समितीची अकरावी बैठक संपन्न

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड महापालिका अंतर्गत येणा-या सर्व मालमत्तांचे जी.आय.एस. (भौगोलिक माहिती प्रणाली) सर्वेक्षण स्मार्ट सिटी मार्फत हाती घेण्यात आले आहे. जी.आय.एस.प्रणालीद्वारे महानगरपालिका क्षेत्रामधील मिळकतीसाठी सुधारीत सेवा, संसाधनांचे सुधारित नियोजन, नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन, पारदर्शक प्रशासन, आपत्कालीन व्यवस्थापन करण्यास मदत होणार असून विविध सॉफ्टवेअर विकसीत करून त्याद्वारे लोकोपयोगी ३५ सेवा पुरविण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.

स्मार्ट सिटी प्रकल्प कामकाजाचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी शहर सल्लागार समितीची अकरावी बैठक ऑनलाईन पार पडली. प्रसंगी, पॅन सिटी व एबीडी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या प्रकल्पांच्या प्रगतीबाबत सल्लागारांमार्फत सादरीकरण करण्यात आले. यावेळी, आमदार लक्ष्मण जगताप (प्रतिनिधी), जिल्हाधिकारी राजेश देशमुख (प्रतिनिधी), अतिरिक्त्‍ आयुक्त प्रदीप जांभळे- पाटील, सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, मुख्य वित्तीय अधिकारी सुनील भोसले, जनरल मॅनेजर (इन्फ्रास्ट्रक्चर) अशोक भालकर, कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार, कार्यकारी अभियंता मनोज सेठीय, सहा. मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीकांत कोल्हे, टेक्निकल एक्सपर्ट डॉ. प्रताप रावळ, युवक प्रतिनिधी अमित तलाठी, विद्यार्थी प्रतिनिधी दिपक पवार, सिटीझन फोरमचे तुषार शिंदे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व सल्लागार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

स्मार्ट सारथी ऍपच्या माध्यमातून १ लाख ८५ हजार नागरिकांपर्यंत पोहोचता आले आहे. तसेच, विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे कॅम्पनींग सुरु आहे. मर्चंड मोडयुल ऍपद्वारे शहरातील छोट्या व्यापा-यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. म्युनिसीपल ई-क्लासचे ८० टक्के काम झालेले आहे. डोर टू डोर सर्व्हे सुरु आहे. कंट्रोल ऍन्ड कमांड सेंटरचे काम प्रगतीपथावर आहे. एबीडी प्रकल्पांतर्गंत रस्त्यांचे ८५ टक्के काम मार्गी लागले आहे. स्मार्ट बस स्टॉप उभारले जात आहेत. स्मार्ट पार्कींग व्यवस्था, सिनिअर सिटीझन प्लाझा, योगा पार्कची कामे देखील प्रगतीवर आहेत. ऑप्टीकल फायबर केबल टाकण्यात आली आहे. वायफाय बसविण्यात आले आहे. पोल उभारण्याचे काम पूर्ण झालेले आहे. सिटी सर्व्हेलन्स अंतर्गत शहरात नेमून दिलेल्या जागेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. स्मार्ट ट्राफिकचे कॅमेरे बसविले असून व्हीएमडी, किओक्स, स्मार्ट पर्यावरण मशीन, स्मार्ट वॉटर मीटर, स्मार्ट सेव्हरेज, सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट आदी स्मार्ट सिटी अंतर्गत सूरू असलेल्या प्रकल्पाची कामे वेगाने सुरु आहेत, तसेच ऑप्टीकल फायबर केबल आणि विविध स्मार्ट एलिमेंटमधून भविष्यात स्मार्ट सिटीला उत्पन्न मिळण्यासाठी निविदा प्रक्रिया सद्यस्थितीत राबविली जात असल्याची माहिती यावेळी सल्लागार प्रतिनिधींनी दिली.

याबाबत प्रशासक शेखर सिंह म्हणाले की, जीआयएस प्रकल्पांतर्गत २ लाख ३२ हजार मालमत्तांचा सर्व्हे पूर्ण करण्यात आला आहे. तसेच, लिडार (LIDAR) यंत्राद्वारे ९७ टक्के सर्व्हे झाला आहे. स्मार्ट ‍सिटी प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मनपाच्या संबंधित विभागांचा सहभाग करून घेण्यात येत असून नागरिकांसाठी प्रकल्प खुली करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी, विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.