जागतिक योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

0
186

पिंपरी – डॉ . डी. वाय पाटील विद्यापीठ ,पुणे संलग्नित डॉ . डी. वाय पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद , हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर , पिंपरी पुणे येथे जागतिक योग् दिनानिमित्त ( २१ जून -२०२२) विविध कार्क्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . दि. १७ जून २०२२ शुक्रवार रोजी जागतिक योग दिनाचे उद्धघाटन अडवाईझर डॉ . बी . पि . पांडे आणि प्राचार्य डॉ. जी. एच. येवला यांच्या हस्ते करण्यात आले .

दि. १७ जून २०२२ रोजी सूर्यनमस्कार स्पर्धा आयोजित करण्यात आली . यामध्ये विविध महाविद्यालयातून 88 स्पर्धकांनी सहभाग घेतला .

दि १८ जून २०२२ रोजी पुणे – पिंपरी -चिंचवड परिसरातील भक्ती-शक्ती, निगडी या ऐतिहासिक स्थळी सामूहिक योग शिबिराचे आयोजन करण्यात आले . कार्यक्रमाचे योग प्रमुख डॉ. संतोष कांबळे आणि 2० विद्यार्थी यांनी योगाचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी विविध योगासने करून नागरिकांना माहिती दिली.

दि २० जून २०२२ सोमवार रोजी योग दिंडीचे आयोजन करण्यात आले. यावेळी पालखीतून योग ग्रंथ ठेऊन आणि विविध योगासनांचे भित्तिचत्रे घेऊन परिसरातून जनजागृतीपर मिरवणूक काढण्यात आली . याप्रसंगी डॉ . डी. वाय पाटील विद्यापीठाचे चान्सलर डॉ. पी डी. पाटीलसर, यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला ,विद्यापीठ व्हॉइस चान्सलर डॉ एन जे पवार आणि रजिस्ट्रार डॉ. ए. एन सूर्यकर प्राचार्य डॉ. जी. एच . येवला , डॉ. बी. पी. पांडे , रजिस्ट्रार दिलीप मोहिते , विविध विभागांचे प्रमुख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि पदवी आणि पद्व्युत्तर व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते .

दि. २१ जून २०२२ मंगळवार रोजी केंद्रीय आयुष्य मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार जागतिक योग दिनानिमित्त सकाळी ७.३० वा. ३५० विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्रत:कालीन योग सत्रामध्ये सहभागी झाले .योग्य शिक्षक दीपाली ढाणे मॅडम यांनी योग सत्राचे संचलन केले. सूर्यनमस्कार स्पर्धेतील तीन विजेत्यांना स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक प्रदान करण्यात आले

योग सत्रामध्ये डॉ. डॉ . डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे पवार , डॉ. जयराज वाय. एम, रजिस्ट्रार डॉ. ए. एन सूर्यकर , डॉ. बी. पी. पांडे, आयुर्वेद कॉलेजचे प्राचार्य डॉ. जी. एच. येवला , होमिओपॅथी कॉलेजचे प्राचार्य डॉ. शर्मा नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या डॉ. रुपाली साळवी , ओप्टिओमेट्री कॉलेजचे प्राचार्य डॉ. वेशाल मदान, डॉ .डेरेक डिसुझा आणि श्री दिलीप मोहिते यांनी योग सत्रामध्ये सहभाग घेतला .

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन स्वस्थवृत्त आणि योग विभागाचे योगप्रमुख डॉ. संतोष कांबळे यांनी केले.