दि. २7 (पीसीबी) – भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम अर्थतज्ज्ञ अशी मनमोहन सिंग यांची ख्याती होती. देशाच्या पंतप्रधान पदी विराजमान झालेले ते पहिले शीख पंतप्रधान होते. २००४ ते २०१४ अशी दहा वर्षे त्यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून काम केलं. त्यांचा राजकीय प्रवास हा अर्थतज्ज्ञ ते पंतप्रधान असा थक्क करणारा आहे.
मनमोहन सिंग यांचा विवाह १९५८ मध्ये झाला
मनमोहन सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी गुरुमुख सिंग यांच्या कुटुंबात झाला. गह पश्चिम पंजाब हे त्यांचं जन्म ठिकाण. देश स्वतंत्र झाल्यानंतर हे ठिकाण पाकिस्तानात गेलं. त्यानंतर त्यांचं कुटुंब अमृतसरमध्ये आलं. मनमोहन सिंग यांनी १९५८ मध्ये गुरुशरण कौर यांच्याशी विवाह केला. मनमोहन सिंग यांना अमृत सिंग, दमन सिंग आणि उपिंदर सिंग अशा तीन मुली आहेत.
शैक्षणिक कारकीर्द –
मनमोहन सिंग हिंदू महाविद्यालयात शिक्षण घेतलं. मनमोहन सिंग हे जिज्ञासू आणि अभ्यासू विद्यार्थी होते. शैक्षणिक कारकिर्दीत ते कायमच प्रथम क्रमांकावर होते. १९५७ मध्ये केंब्रिज विद्यापीठातून मनमोहन सिंग अर्थशास्त्रात ऑनर्स पदवी घेतली. १९६२ त्यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डी. फिल केलं. तसंच त्यांनी इंग्लंड येथील केंब्रिज विद्यापीठातून पीएचडी केली. या विद्यापीठात राइट्स पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
चंदीगड विद्यापीठात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं. तसंच दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्येही शिक्षक म्हणून काम केलं. १९७२ मध्ये मनमोहन सिंग हे अर्थ खात्याचे प्रमुख आर्थिक सल्लागार होते. १९७६ मध्ये ते अर्थमंत्रालयाचे सचिव झाले. १९८० ते १९८२ यांनी नियोजन आयोगाचे सदस्य म्हणून काम केलं. १९८२ मध्ये माजी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी मनमोहन सिंग यांची नियुक्ती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून करण्यात आली. १९८५ ते १९८७ या कालावधीत मनमोहन सिंग नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते.
मनमोहन सिंग यांची व्यावसायिक आणि राजकीय कारकीर्द
१९५७ ते १९५९ या कालावधीत अर्थशास्त्राचे वरिष्ठ व्याख्याता म्हणून काम केले.
१९६३ ते १९६५ या काळात प्राध्यापक होते.
१९६६ मध्ये दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मानद प्राध्यापक होते.
१९६६ ते १९६९ पर्यंत UNCTD सोबत काम केले.
१९६९ ते १९७१ पर्यंत आंतरराष्ट्रीय व्यापारात प्राध्यापक म्हणून काम केले.
मनमोहन सिंग यांची ललित नारायण मिश्रा यांनी परराष्ट्र व्यापार मंत्रालयाचे सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती.
१९६९ मध्ये मनमोहन सिंग दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्राध्यापक होते.
१९७२ मध्ये अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार बनले.
१९७६ मध्ये अर्थ मंत्रालयात27-12-2024 at 00:25 सचिव होते
१९७६ मध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मानद प्राध्यापक होते.
१९७६ ते १९८० या कालावधीत मनमोहन सिंह भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक होते.
१९८२ ते १९८५ या तीन वर्षांच्या कालावधीत मनमोहन सिंह यांनी RBI चे गव्हर्नर म्हणून काम केलं.
१९८५-१९८७ या कालावधीत मनमोहन सिंह यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम केले.
१९८७ ते १९९० या कालावधीत मनमोहन सिंह दक्षिण आयोगाचे महासचिव म्हणून कार्यरत होते.
१९९१ मध्ये केंद्रीय लोक आयोगाचे अध्यक्ष होते आणि त्यानंतर ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष बनले.
२००४ ते २०१४ या कालावधीत ते भारताचे पंतप्रधान होते.
मनमोहन सिंग यांनी १९६४ मध्ये ‘इंडियाज एक्सपोर्ट ट्रेंड्स अँड प्रॉस्पेक्ट्स फॉर सेल्फ – सस्टेन्ड ग्रोथ’ नावाचं पुस्तक लिहिलं. त्यांनी अनेक लेखही लिहिले जे अर्थशास्त्राच्या जर्नल्सच्या श्रेणीत प्रकाशित झाले.