जपानला मागे टाकात जर्मनी बनली जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था

0
399

जपान, दि. १५ (पीसीबी) – जपानची अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत आहे. सलग दोन तिमाहीत जीडीपीमध्ये झालेल्या घसरणीने जपानच्या अर्थव्यवस्थेत घसरण झाली आहे. जपानला मागे टाकात जर्मनी ही जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. जपानचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये वार्षिक 0.4% घसरले.

या घसरणीनंतर, सेंट्रल बँक ऑफ जपानचे गव्हर्नर काज़ुओ उएदा यांच्यासाठी व्याजदर कमी करण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. याशिवाय, आर्थिक धोरणाच्या मुद्द्याबाबत जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासमोरही मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

जपानने तिसऱ्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचा मान गमावला?
सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2023 साठी जपानचा नाममात्र GDP 4.2 ट्रिलियन डॉलर होता. येनच्या घसरणीमुळे हा मोठा बदल दिसून आला आहे. 2022 मध्ये, जपानचे चलन डॉलरच्या तुलनेत सुमारे 20 टक्क्यांनी घसरले, तर गेल्या वर्षी ते 7 टक्क्यांनी घसरले.

भारत जपान-जर्मनीला टक्कर देईल
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा (IMF)अंदाज आहे की भारताची अर्थव्यवस्था 2026 मध्ये जपान आणि 2027 मध्ये जर्मनीला मागे टाकेल आणि जगातील तीन प्रमुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या यादीत सामील होईल. सध्या जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत भारत पाचव्या क्रमांकावर आहे.