जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणा-या दोघांना अटक

0
293

खेड, दि. ६ (पीसीबी) – जनावरांची अवैधरित्या टेम्पोतून वाहतूक करणा-या दोघांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 6) दुपारी खेड तालुक्यातील वराळे गावात करण्यात आली.

प्रमोद दामोदर मिसाळ (वय 36, रा. मारुंजी, ता. मुळशी), ईश्वर रघुनाथ पवार (वय 37, रा. चांदखेड, ता. मावळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक अशोक गभाले यांनी महाळुंगे चौकीत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडे जनावरांची वाहतूक करण्याबाबत कोणताही परवाना नसताना त्यांनी तीन लाख रुपये किमतीच्या टेम्पोत 18 हजारांची दोन जनावरे क्रूरपणे बांधून त्यांची वाहतूक केली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वराळे गावच्या हद्दीत कारवाई करून दोघांना अटक केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.