चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारू भट्टीवर पोलिसांना छापा

0
145

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपरी गाव येथे सुरु असलेल्या दारू भट्टीवर गुन्हे शाखेने छापा मारून कारवाई केली. ही कारवाई बुधवारी (दि. 6) दुपारी करण्यात आली.

याप्रकरणी आदित्य राघू कुंभार (रा. चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार राहुल सूर्यवंशी यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आदित्य याने गावठी दारू तयार करण्यासाठी खेड तालुक्यातील पिंपरी गाव येथे भाम नदीच्या काठावर भट्टी लावली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. या कारवाई मध्ये पाच लाख नऊ हजार 600 रुपयांचे 25 हजार 480 लिटर कच्चे रसायन नष्ट करण्यात आले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.