चांगले विचारच उद्याची ओळख

0
242

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांडेवाडी, भोसरी येथे कीर्तन महोत्सवात भोसरीचे प्रथम आमदार मा. श्री विलास विठोबा लांडे यांचे आई- वडील ह भ प स्व.विठोबा सोनबा लांडे व स्व. इंदुबाई विठोबा लांडे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त महाविद्यालयाच्या प्रांगणात सेवा हभप उद्धव महाराज मंडलिक यांनी समर्पित केली . या कीर्तन महोत्सवात श्री विलास लांडे यांनी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सुवर्ण मंदिर, श्री क्षेत्र भंडारा डोंगर जीर्णोद्धारसाठी देणगी देण्याचे आवाहन केले.

आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करताना हभप उद्धव महाराज मंडलिक यांनी संत तुकाराम महाराजांचा मानवी जीवनाचे महत्त्व, मनुष्य देह मिळाल्यानंतर भक्ती करणे हे परमकर्तव्य आहे ह्या अभंगांचे निरूपण केले लांडेसाहेबांची आईवडीलांप्रती असणारी निष्ठा वाखाणण्याजोगी आहे . आधुनिकता आणि अध्यात्म एकत्र नांदणे ही दुर्मिळ गोष्ट लांडे परिवाराकडे आहे.

परमार्थ महान धन असून ते कधी ही संपणार नाही तर ते दिवसेंदिवस वाढतच असते .कोणत्याही क्षेत्रात काम करा पण चांगले विचार अंगीकृत करा. तीच तुमची उद्याची ओळख आहे .प्रज्ञावंत माणसे स्वतःला कधी गरीब समजत नाही.विचारांनी संपन्न माणसे कधीच दरिद्री नसतात “.तुका म्हणे आम्ही त्रैलोक्याचे राजे!” उद्धव महाराज पुढे म्हणाले, प्रत्येक जीव परमात्म्याचा अंश आहे श्रेष्ठ लोक स्वतः ची तुलना स्वतःशीच करतात.

कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी ह.भ.प .पुरुषोत्तम महाराजांनी विशेष योगदान दिले . मा. श्री विलास लांडे ,सौ मोहिनी ताई लांडे ,मा.श्री विश्वनाथ लांडे सौ. संगीताताई लांडे , सौ हिराबाई विठ्ठल मुंगसे , सौ.मिराबाई हिरामण गोडसे, सौ.मिराबाई मारुती गुजर, श्री विक्रांत लांडे,सौ.शुभांगी लांडे, श्री विराज लांडे,सौ.कांचन लांडे ,सौ. विनया सुधीर मुंगसे,सौ विशाखा आदित्य शिंदे हे लांडे परिवारातील सदस्य उपस्थित होते .

संस्थेचे सचिव मा श्री सुधीर मुंगसे खजिनदार व विद्यमान नगरसेवक मा श्री अजितभाऊ गव्हाणे, विश्वस्त श्री विश्वनाथ कोरडे,विश्वस्त व विद्यमान नगरसेवक पिं .चिं .मनपा मा.श्री विक्रांत लांडे , श्री गणेश शिंदे , सर्व विश्वस्त मंडळ श्री पंडित गवळी, हे.भ.प.बाळासाहेब काशीद महाराज, माणिकराव जैद, प्राचार्य.उपप्राचार्य , विभाग प्रमुख सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिपक साकोरे यांनी केले तर विद्यमान नगरसेवक पिंचिं मनपा मा. श्री विक्रांत लांडे यांनी आभार मानले.