घरेलू कामगारांना मिळाले दहा हजार रुपये, कष्टकरी संघर्ष महासंघाचे प्रयत्नाला यश.

0
197

पिंपरी दि.३० – वर्षानुवर्ष घरकाम करणाऱ्या महिलांना कामगार दिनाच्या पूर्वदिनी समाधानाची बातमी मिळाली, वयाची ५५ वर्षे पूर्ण केलेल्या घरेलू कामगाराना महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळात नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना १० हजार रु सन्मानधन मिळायाला सुरुवात झाली असून महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती व कष्टकरी संघर्ष महासंघाच्या प्रयत्नाला यश आलेले आहे. याचे स्वागत कष्टकरी महिलांनी एकमेकांना साखर वाटप करून समाधान व्यक्त केले.

यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, महिला अध्यक्षा माधुरी जलमुलवार अनिता घाडगे, कांताबाई गाडे, मनीषा भागवत, अर्चना चंदनशिवे, सुरेखा भंडारे, रेश्मा चव्हाण, शबाना पठाण, सविता टेकाळे, सविता प्रधान, चंद्रकला वाघमारे, विद्या तरकसे
आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्यातील घरेलू कामगारांना आरोग्य विमा मिळावा, अपघाती विमा संरक्षण मिळावे व महामंडळ पुनर्जीवित करावे या मागणीसाठी कष्टकरी संघर्ष महासंघाने हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर येथे भव्य मोर्चा काढला होता यावेळी कामगार मंत्र्यांशी सन्मानधना बाबत सकारात्मक चर्चा झाली होती त्याच बरोबर कामगार उपायुक्त अभय गीते यांची भेट घेऊन सदरच्या योजनेतील वयाची अट कमी करावी तसेच नूतनीकरणाच्या जाचक अटी कमी कराव्यात अशी मागणी करण्यात आलेली होती . महासंघाचे प्रयत्नाला यश मिळालेले असून घरेलू कामगार मंडळाच्या सन्मानधन योजना अंतर्गत १० हजार रूपये रक्कम
अटींची पूर्तता केलेल्या शहरातील लाभार्थ्यांना मिळायला सुरुवात झाली याबद्दल घरेलु कामगारांकडून समाधान व्यक्त केले जात आहे .