गांजा विक्री प्रकरणी एकास अटक

0
193

पिंपरी, दि. 1 (पीसीबी)-गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक किलो गांजा, दुचाकी, मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. ३१) दुपारी कावेरीनगर वाकड येथे करण्यात आली.

राजेंद्र उर्फ राजू उर्फ पप्पू अभिमान जाधव (वय २९, रा. वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने निलेश सुकळे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्याकडून गांजा आणला असल्याचे निष्पन्न झाल्याने निलेश विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई प्रसाद जंगीलवाड यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र याने निलेश याच्याकडून विक्रीसाठी गांजा आणला. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी राजेंद्र याच्या घराजवळ सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक किलो पेक्षा अधिक गांजा, एक दुचाकी आणि एक मोबाईल फोन असा एक लाख २५ हजार २०० रुपयांचा ऐवज आढळला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.