गरोदर राहिल्याने अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराला वाचा

0
449

चिंचवड, दि. ८ (पीसीबी) – अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला असल्याचा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार एप्रिल महिन्यात केशवनगर चिंचवड येथे घडला.

अजय शंकर फडतरे (वय 19, रा. चिंचवडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने गुरुवारी (दि. 7) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पीडित 15 वर्षीय मुलीसोबत आरोपीने मागील एक वर्षापासून प्रेमसंबंध ठेवले. पीडित मुलीसोबत लग्न करणार असल्याचे म्हणून आरोपीने फिर्यादी यांच्या घरी येऊन पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केला. मुलगी नऊ आठवडे चार दिवसांची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.