खुनी हल्ला प्रकरणी चौघांना अटक

0
660

निगडी, दि. ८ (पीसीबी) – जुन्या भांडणाच्या कारणावरून सहा जणांनी मिळून हवेत कोयते नाचवत दहशत पसरवली. एका वाहनांची तोडफोड करून एका महिलेवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (दि. ७) मध्यरात्री ओटास्किम निगडी येथे घडली.

सॅमसन रॉबर्ट जॉन (वय २५), सुरज वाघमारे (वय २२), रफिक शेख (वय २०), सलमोन रॉबर्ट जॉन (वय ३०), दोन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी २८ वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी मोठमोठ्याने आरडाओरडा केला. सॅमसन याने कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण केली. फिर्यादींच्या घरासमोर पार्क केलेल्या गाडीवर कोयता मारला. त्यामुळे फिर्यादी घरातून बाहेर आल्या. त्यावेळी आरोपीने फिर्यादीवर कोयत्याने वार केला. तो फिर्यादींनी चुकवला आणि भीतीने घरात गेल्या. त्यानंतर फिर्यादी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जात असताना दोन महिलांनी फिर्यादीस पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर बघून घेईन अशी धमकी दिली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.