खासदार बंडाच्या तयारीत, शिवसेनेत मोठी खळबळ

0
225

– भाजपाचा शिवसेना हायजॅक करण्याचा प्लॅन

मुंबई, दि. २४ (पीसीबी) : शिवसेनेतील १९ खासदारांचा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा असल्याचा दावा करण्यात येत आहे. एकाही खासदाराने आपण शिंदे यांना पाठिंबा देत असल्याचे सांगितलेले नाही. मात्र ते शिंदे यांना पाठिंबा देत आहेत. कारण भारतीय जनता पक्षाबरोबर आघाडी झाल्यास व एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेल्यास त्यांचे भविष्य आणखी सुरक्षित होऊ शकते, असे शिवसेना नेत्याकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, आमदारांच्या पाठोपाठ खासदारांनीही बंडाचे निशान फडकविले तर शिवसेना नेस्तनाबूत करण्याचा भाजपाचा संकल्प सिध्दीस जाणार आहे. पूर्ण शिवसेना हायजॅक करण्याचा भाजपाचा प्लॅन आहे, असे सांगण्यात आले.

जेव्हा याबाबत शिवसेना खासदाराशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. पक्षाची भाजपबरोबर पूर्वी असलेली आघाडी सोयीची होती. मात्र सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसशी गैरसोयीचे असल्याचा दुजोरा संबंधित खासदाराने दिला आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आपण उध्दव ठाकरे यांच्या बरोबर असल्याचा खुलासा केला आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांंच्या बरोबर १९ पैकी १५ खासदार बंडाच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.