खासगी ट्रॅव्हलच्या बसने घेतलला पेट ; ११ जणांचा होरपळून मृत्यू तर 38 जखमी…!

0
292

नाशिक दि. ८ (पीसीबी) –  नाशिक- औरंगाबाद महामार्गावर एका खाजगी बसचा भिषण अपघात झाला असून या अपघातात ११ प्रवाश्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर ३८ प्रवासी जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चितांमणी ट्रॅव्हलची बस यवतमाळ ते मुंबई जात होती. नाशिकमध्ये मिरची हॉटेल जवळ एका आयशर ट्रक आणि बसचा अपघात झाला. त्यानंतर ट्रॅव्हल्स बसला भीषण आग लागली.

पहाटे अपघात झाला तेव्हा अनेक प्रवासी झोपेत होते. त्यांना त्यातून बाहेर पडणे देखील शक्य झाले नाही. त्यामुळे मृतांची संख्या वाढली. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.या अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी अग्नीशमन दल तसे रुग्णवाहीका दाखल झाल्या. त्यात ३८ प्रवाशी जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात हलविले आहे. त्यातील सहा प्रवासी गंभीररित्या भाजलेले आहेत.

दरम्यान, चितांमणी ट्रॅव्हलची बस यवतमाळ ते मुंबई जात होती. नाशिकमध्ये मिरची हॉटेल जवळ एका आयशर ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला. त्यानंतर ट्रॅव्हल्स बसला भीषण आग लागल्याचे समजते. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस तपास करीत आहेत.