खाजगी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर लैंगिक अत्याचार

0
450

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – महिलेसोबत काढलेले खाजगी अश्लील फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. महिलेला जीवे मारण्याची धमकी देत तिच्याकडून पैसे घेतले. ही घटना ८ मे २०१७ ते १६ जून २०२२ या कालावधीत तळवडे आणि चिंचवड येथे घडली.

सलीमुद्दीन अलिमुद्दीन खान (वय ३२, रा. उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या उत्तर प्रदेश येथील मूळगावी नातेवाईकाच्या लग्नासाठी गेल्या होत्या. तिथे त्यांची आरोपीसोबत ओळख झाली. त्यानंतर आरोपीने फिर्यादीकडे वारंवार पैशांची मागणी केली. दरम्यान त्यांच्यात झालेल्या ओळखीतून आरोपीने फिर्यादींसोबत सेल्फी काढला. तो फोटो फिर्यादीच्या पतीला पाठवण्याची धमकी देऊन सन २०१९ मध्ये तळवडे येथे महिलेवर लैंगिक अत्याचार केला. लैंगिक अत्याचार करताना आरोपीने व्हिडीओ रेकॉर्ड केला. तो व्हिडीओ व्हायरल करण्याची व जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपीने पीडित महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. तसेच फिर्यादीकडून आरोपीने पैसेही घेतले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.