क्रेडिट कार्डमधून दोन लाख काढत फसवणूक

0
458

दिघी, दि. २७ (पीसीबी) – हॉटेल मधून बोलत असल्याचे सांगून ऑफर देण्याच्या बहाण्याने लिंक पाठवून त्याआधारे क्रेडिट कार्ड मधून दोन लाख तीन हजार रुपये काढून घेत फसवणूक केली. ही घटना 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी चऱ्होली बुद्रुक येथे घडली.

धीरज कुमार जैन (वय 42, रा. चऱ्होली बुद्रुक) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीस अज्ञाताने फोन करून तो सुकांता थाळी येथून बोलत असल्याचे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादीला ऑफर देण्याच्या बहाण्याने त्यांना एक लिंक पाठवून त्याआधारे फिर्यादी यांच्या क्रेडिट कार्डमधून दोन लाख तीन हजार 95 रुपये काढून घेत फसवणूक केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.