कोरोनाचा पुन्हा हाहाकार !

0
325

पुणे, दि. २१ (पीसीबी) – भारताचा शेजारी राष्ट्र चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने हाहाकार माजवण्यास सुरूवात केली आहे. चीनमधील वाढत्या रूग्ण संख्येच्या पार्शवभूमीवर भारतासह अनेक देशांनी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे.

दरम्यान, चीनमधील वाढत्या रूग्णसंख्येत कोविशील्ड लस निर्माते अदर पुनावालांनी ट्वीट करत मोठं विधान केले आहे. पुनावाला म्हणाले की, चीनमध्ये कोरोनाची संख्या पुन्हा एकदा वाढणे चिंताजनक आहे. मात्र, कोरोना विरोधातील भारतात झालेले लसीकरण आणि ट्रॅक रेकॉर्ड लक्षात घेता वाढत्या रूग्णसंख्येत भारतीयांनी अजिबात घाबरून जाण्याची गरज नाहीये. परंतु, केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर विश्वास ठेवून त्याचे पालन करणे आवाहन पुनावाला यांनी नागरिकांना केले आहे.

दरम्यान, काही देशांमध्ये कोविड-19 प्रकरणांची वाढती संख्या पाहता, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सर्व कोविड-पॉझिटिव्ह प्रकरणांचे नमुने INSACOG लॅबमध्ये पाठवण्यास सांगितले आहे.