कोकणकड्यावरून उडी मारून तिने जीवन संपविला

0
232

घाटकोपर, मुंबई येथे राहणारी अवनी भानुशाली या २३ वर्षीय तरुणीने हरीश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावरून उडी मारून आपले जीवन संपविले. दोन पानांची स्युसाईड नोट हाती लागली आहे, पण कारण समजू शकलेले नाही. रविवारी (ता. ७)पाचनई गावातून अवनीने गावातील स्थानिक वाटाड्याला सोबत घेऊन अहमदनगर जिल्ह्यातील हरीश्चंद्रगड सर करायला सुरुवात केली. दुपारी दोनच्या सुमारास गडाच्या कोकणकड्याजळ आली असता, पाठीवरील बॅग बाजूला काढत तिने कड्यावरून अचानक खाली उडी मारली. सोबत असलेल्या गाईड समोरच हे घडले. त्याने पाचनई गावचे सरपंच भास्कर बादड यांना सदर घडलेली घटना कळवली असता बादड यांनी पोलीस स्टेशनला व रेस्क्यु समनवयक ओंकार ओक यांना माहिती कळवली. ओक यांनी त्वरित लोणावळ्याचे गणेश गिध, नाशिकचे दयानंद कोळी यांना माहिती दिली.

गणेश गिध यांच्या नेतृत्वा खाली सोमवारी (ता. ८) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास कोकणकड्यावरून दीपक विषे व तनया कोळी हे दोघे जण रोपच्या सहायाने १४०० फुट खोल दरीत स्ट्रेचर व विक्टिम बॅग घेऊन खाली उतरले. १८०० फुट उंचीचा कोकणकडा रॅपलिंग करणे हे मोठ्या जिकिरीचे काम, उन्हाळ्यात उतरणे तर अजूनच थरारक काम असते.

अनेक संकटाना सामोरे जात दीपक विषे व तनया कोळी हे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मृतदेहा जवळ येऊन पोहचले. त्यांनी छिन्न विछिन्न अवस्थेतील मृतदेह शवबॅगेत भरला. कोकणकड्यावर असलेल्या रेस्क्यु टीमच्या सदस्यांनी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान मृतदेह वरती खेचला व राजूर पोलीसांच्या ताब्यात दिला.

नाशिक क्लाइंबर्स अँड रेस्क्युअर्स असोसिएशनचे दयानंद कोळी, तनया कोळी,अभिजीत वाघचौरे, अजय पाटील, टीम डेला ऍडव्हेंचरचे गणेश गीध, आकाश अंभोरे, सुधीर उंबरे, शैलेश शेलोकर, विनायक गोपाळे, दर्शन देशमुख सह्याद्री एडवेंचर मुरबाडचे दीपक विशे,टीम शिवगर्जनाचे सतीश बोबडे, तन्मय माने, भरत जाधव, टीम रक्षा सामाजिक विकास मंडळाचे सुमित गुरव, गडाच्या परिसरातील स्थानिक कमळू पोकळा, रवी झाडे, नामदेव बांडे, गोरख भारमल, भास्कर बादड, दत्ता भारमल, किरण भारमल व सखाराम भारमल, आत्माराम भारमल यांनी अवनी भानुशाली हीचा मृतदेह वर काढण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

दोन पानी सुसाईड नोट लिहत जीवन प्रवास संपवीला…
आई बाबा मला माफ करा मी हे खुप विचार करून करत आहे. मला माफ करा मला कोणीही मदत करू शकले नाही. खुप काही सांगायचे आहे, पण सांगु शकत नाही. शब्दात व्यक्त करणे अवघड आहे. मी प्रार्थना करते कि जगात कोणीहि असे पाऊल उचलु नये. या भावनिक शब्दांची दोन पानी सुसाईड नोट अवनीच्या बॅगेत सापडली असुन आत्महत्या करण्याचे खरे कारण अज्ञात असल्याचे समजते.
या दोघांनी अवघड असा कोकणकडा १४०० फुट खाली उतरत हे असाध्य कार्य करून दाखविले.विषे यांच्या पाठीशी रेस्क्युचा अनुभव असुन त्यांनी सह्याद्रीच्या या परिसरातील अनेक बचाव मोहिमांमध्ये सहभाग नोंदविला आहे. तनया कोळी या वीस वर्षीय तरुणीने देखील कमालिचे साहस दाखवत या बचाव मोहिमेत स्वतः खाली उतरली.