केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने फसवणूक

0
153

फुगेवाडी, दि. २३ (पीसीबी) – बँक खात्याला केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने लिंक पाठवून वृद्ध व्यक्तीची एक लाख सात हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 4 जून 2021 रोजी फुगेवाडी येथे घडली.

ललितकुमार कचरुलाल ओस्तवाल (वय 61, रा. फुगेवाडी) यांनी याप्रकरणी 22 सप्टेंबर रोजी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 917407141742 क्रमांक वापरकर्ता, आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डचा वापरकर्ता यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने 917407141742 या क्रमांकावरून फिर्यादी यांच्या मोबाईलवर एसबीआय बँक खात्याची केवायसी अपडेट करण्यासाठी बनावट लिंक पाठवली. बनावट वेबसाईटद्वारे फिर्यादीची गोपनीय माहिती घेऊन त्याआधारे एक लाख सात हजार रुपये खात्यावरून वळते करून फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.