केरळमध्ये सूर्य कोपला, 54 अंशावर तापमान

0
323

कोची, दि. ११ (पीसीबी) : केरळमध्ये सूर्यनारायणाचा प्रकोप पाहायला मिळतोय. केरळमध्ये तापमानाने सर्व विक्रम मोडीत काढलेत.. केरळच्या काही भागांमध्ये 54 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय.. केरळातील जनजीवनावर याचे थेट परिणाम दिसून येतायत. केरळचा दक्षिणी भाग, अलपुढ्झा, कोट्टायम, कण्णूर या जिल्ह्यांमध्ये तापमानानं 54 अंशांचा आकडा गाठला. पुढील काही दिवस हीच परिस्थिती राहणार असल्याचा इशारा देण्यात आलाय. तेव्हा गंभीर आजार आणि हीट स्ट्रोकचा धोका अनेक पटींनी वाढू शकतो… तेव्हा दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचा सल्लाही देण्यात आलाय..