कुरुळी येथे पादचारी तरुणाला लुटले; एकास अटक

0
309

चाकण, दि. १ (पीसीबी) – कुरुळी येथे इंद्रायणी नदीच्या पुलावरून मित्रासोबत पायी चालत जाणा-या तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून दोघांनी लुटले. त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 23 मे रोजी मध्यरात्री एक वाजता घडली.

देवानंद डोमाजी घोडे (वय 21, रा. खराबवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. 31) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय बलभीम जाधव (वय 25, रा. चिखली) आणि एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा अमित्र राजेश 23 मे रोजी मध्यरात्री एक वाजता पायी चालत कुरुळी येथे इंद्रायणी नदीच्या खालच्या पुलावरून जात होते. त्यावेळी एका दुचाकीवरून दोघेजण आले. त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादी यांच्या खिशातून 12 हजारांचा मोबाईल फोन आणि 1900 रुपये रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.