किरकोळ कराणावरून तरुणाला टोळक्याकडून सिमेंट ब्लॉकने मारहाण, सहा जाणांना अटक

0
401
crime

चिंचवड, दि. २८(पीसीबी) किरकोळ कारणावरून तरुणाला टोळक्याने सिमेंट ब्लॉक ने मारहाण करत जिवघेणा हल्ला करण्यात आला, ही घटना सोमवारी (दि.26) चिंचवड, संभाजीनगर येथे घडला आहे.

याप्रकरणी आकाश बम्हदेव नरुटे (वय 23 रा.चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून निगडी पोलिसांनी प्रतिक पाटोळे,राहूल मोहटा, करण चंडालिया, अमोल शिंदे,महेश गायकवाड, योगेश गालफोडे यांना अटक केली आहे. तर यासीन शेख, खली उर्फ सोनू गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यासीन शेख याच्याशी फिर्यादीचा मित्र चेतन गायकवाड यांच्या सोबत भांडण झाले होते. याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादीला तू चेतन सोबत का फिरतोस म्हणत तुला आता सोडत नाही म्हणत शिवीगाळ करत आरोपींनी सिमेंट चा ब्लॉक जिव घेण्याच्या उद्देशाने डोक्यात, पाठीत मारून गंभीर जखमी केले. यावरून निगडी पोलिसांनी सहा जणांना अटक ेली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.