कितीही छोटा प्लॉट असेल त्यावरचे घर किंवा इमारतीची नोंदणी झाली पाहिजे

0
310

पुणे, दि.३ (पीसीबी) – गुंठेवारीवरील कितीही छोटा प्लॉट व त्यावरील इमारतीची नोंदणी करण्याचा निर्णय शासनाने याआगोदारच घेतलेला आहे. तर गावामध्ये बांधलेल्या घराचे विकास प्राधिकरणाने आराखडे संमत करून नोंदविले पाहिजे. अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना वरील माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महानिरीक्षक श्रावण हार्डीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना पाटील म्हणाले कि, शासनाने गुंठेवारीवर असा निर्णय केला आहे की, किती हे स्मॉल प्लॉट असेल त्यावरचे घर किंवा इमारतीची नोंदणी झाली पाहिजे. हवेली तालुक्यामध्ये आणि परिसरामध्ये काही हजार नाही तर लाख घरे तयार झाली आहेत. तर नोएडाला जी टेक्निक वापरून घरी पाडली गेलेली आहे. ती वापरून आपण घरे पडणार आहोत का? त्या घरांमध्ये नागरिकांनी राहायला यायचे की नाही?

नागरिकांनी कर्जबाजारी होऊन त्यामध्ये पैसे गुंतवणूक करून घरे खरेदी केलेले आहेत. बिल्डरने बँकेतील लोन काढून स्कीम पूर्ण केलेले आहे. अनेक बिल्डर आणि त्या घरांमध्ये राहायला इच्छुक असणारे नागरिक हे आता आत्महत्या करण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत.

दरम्यान, प्रामुख्याने गुंठेवारीच्या नोंदणी न होणे,दस्त नोंदला न जाणे हा खूप विषय अडचणीचा होत चाललेला आहे. प्रामुख्याने हवेली तालुक्यामधल्या सगळ्या नोंदी बंद आहेत. शासनाचा नियम आहे की, बागायती क्षेत्र ११ गुंठ्यापेक्षा कमी असेल तर त्याचा खरेदी विक्रीचा व्यवहार करता येत नाही. त्या पाठीमागचा शासनाचा हेतू असा होता की, बागायती शेती क्षेत्र कमी होऊ नये. पण आता सर्वच गावे जर शहरांमध्ये जात असतील, तर त्या गावांमध्ये अशा प्रकारचा निवास होणारच, तर जिरायती क्षेत्रासाठी ४० गुंठ्याच्या खाली खरेदी-विक्री व्यवहार बंद आहे. असेही पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.

ग्रामपंचायत मध्ये बांधलेले घर मला मान्य आहे. परंतु, ग्रामपंचायतीचा नियंत्रित विकास झाला पाहिजे, त्याची मान्यता देणारी ऑथॉरिटी असली पाहिजे. त्याची मान्यता घेण्यासाठी आपण जिल्हाधिकारी किंवा प्रांत कार्यालयामध्ये टाकली पाहिजे.

परंतु, मुळातच महाराष्ट्रात एकूण गावे ४२ हजार आहेत. ज्या गावांना ग्रामपंचायत आहे. अशी २७ हजार गावे आहेत. हि गावे तहसील, प्रांत किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन केव्हा त्या जागेचा नकाशा मान्य करून घेणार? त्यामुळे हवे तर गावाच्या विकासासाठी वेगवेगळी विकास प्राधिकरण करण्यात यावेत. आणि विकास प्राधिकरणाने आराखडे संमत करावेत आणि गावामध्ये बांधलेले घर हे नोंदविले पाहिजे. अशा दोन मागण्या पाटील यांनी केल्या आहेत.