काश्मिरी पंडितांच्या पाठीशी रझा अकादमी

0
261

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीयत. येथील हिंदूंना दहशतवादी सातत्यानं लक्ष्य करत आहेत. काश्मीरमध्ये हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांच्या घटनानंतर काश्मिरी पंडितांनी खोरं सोडलंय. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एकाच दिवसात काश्मिरातील तब्बल 1 हजार 800 पंडितांसह 3 हजारहून अधिक हिंदूंनी काश्मीर सोडल्याचं वृत्त समोर आलं. त्यामुळं काश्मिरातील हिंदू वस्त्या पुन्हा ओस पडू लागल्या आहेत.

दरम्यान या घटना थांबवण्यासाठी रझा आकादमीतर्फे मुंबईतील मिनारा मशिदीबाहेर निदर्शने करण्यात आली. यावेळी मुस्लीम बांधवांतर्फे घोषणाबाजी करण्यात आली. काश्मीरमध्ये अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी उपस्थितांनी केली. काश्मिरी पंडितांच्या पाठीशी उभे असल्याचं रझा अकादमीचे अध्यक्ष मुहम्मद सईद नूरी यांनी म्हटलंय.