काळेवाडीत रिक्षा चालकावर कोयत्याने वार, एकाला अटक

0
838

काळेवाडी, दि. २४ (पीसीबी) – जुन्या भांडणाच्या रागातून तिघांनी एका रिक्षा चालकावर जिवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हा सारा प्रकार मंगळवारी (दि.22) दुपारी काळेवाडीतील राहणी फाटा येथे घडली.

दीपक नाथा मिसाळ (वय 26 रा. रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.23) फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी सौरभ विकास साठे (वय 20 रा.रहाटणी) याला अटक केली असून त्याच्या इतर दोन साथीदारांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिक्षा स्टँडवर त्यांच्या रिक्षात बसले होते. यावेळी त्यांच्या ओळखीचा सौरभ हा त्याच्या इतर दोन साथीदारांसह तिथे आला. त्यांनी काही बोलण्या आधीच फिर्यादीवर वार करत मारण्यास सुरुवात केली. यावेळी याला जिवंत सोडायचे नाही असे म्हणत त्यांनी फिर्यादीच्या डोक्यात कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र फिर्यादीने तो वार चुकवला यात त्यांच्या हाताला गंभीर जखम झाली. यावरून वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.