चिंचवड,दि.०७(पीसीबी) – थेरगाव येथील प्रभाग क्रमांक 23 मधील महापालिकेच्या अनुक्रमे, कामगार नेते श्री शंकर अण्णा गावडे भवन, श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा थेरगाव गावठाण येथील पुतळा या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमणे खूप गरजेचे आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज याच्या पुतळ्याला समाज कंटकाकडून काही घात घडू नये, तसेच कामगार भवन येथे शेजारीच भरपुर प्रमाणात दारुचे धंदे आहेत.
त्यामुळे तेथे रात्री अंधाराचा फायदा घेऊन भरपुर तळीराम दारू पिण्यास बसतात व तेथेच तोडफोड करून घान करून ठेवतात. या सर्व गोष्टी रोखायच्या असतील तर तेथे चोवीस तास सुरक्षा रक्षक नेमणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे या ठिकाणी स्थानिक भूमीपुत्रांची येथे नेमणूक करावी जेणे करुन येथील भूमीपुत्रांना रोजगार उपलब्ध होईल अशी मागणी पिंपरी चिंचवड महापालिकेचे मा. स्विकृत नगरसेवक संतोष गुलाब बारणे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख निलेश तरस, मा. स्विकृत नगरसेवक संतोष बारणे, शिवसेना चिंचवड विधानसभा प्रमूख ,विभाग प्रमुख आकाश बारणे यांच्यावतीने हे निवेदन देण्यात आले.मा. श्री शेखर सिंहजी
आयुक्त पिंपरी चिंचवड मनपा.
मा. श्री उल्हास जगताप
अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड मनपा.
मा. श्री उदय जरांडे
मुख्य सुरक्षा अधिकारी, पिंपरी चिंचवड मनपा
मा. श्री. विनोद झळक सो.
क्षेत्रिय अधिकारी” ग” क्षेत्रीय कार्यालय थेरगाव,पिंपरी चिंचवड
यांना निवेदन देण्यात आले