Pune

एमआयएम सुध्दा चिंचवड लढवणार

By PCB Author

January 24, 2023

पुणे, दि. २४ (पीसीबी) – आमदारांच्या निधनामुळे होत असलेली कसबा पेठ,पुणे आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक आता तिरंगी होईल,असे संकेत आज (ता.२४) मिळाले.कारण आता ती `एमआयएम` सुद्धा (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन- AIMIM)लढणार आहे.परिणामी ती बिनविरोध होण्याच्या भाजपच्या आशेवर पाणी फिरले आहे.

चिंचवडच्या तुलनेत कसब्यात भाजपसह सर्वच राजकीय पक्षांकडे इच्छूकांची संख्या मोठी आहे. त्याला `एमआयएम` सुद्धा अपवाद नाही.त्यांच्याकडे कसब्यात पाच,तर चिंचवडला तीन इच्छूक आहेत.मात्र, उमेदवारी कोणाला द्यायची याची घोषणा प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलिल हे २७ तारखेला पुण्यात करणार आहेत,अशी माहिती या पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते आणि पिंपरी चिंचवड अध्यक्ष धम्मराज साळवे यांनी आज दिली. यामुळे सुरवातीला बिनविरोध निवड होण्याची चर्चा असलेली ही निवडणूक आता महाविकास आघाडी, युती, एमआययएम अशी तूर्तास तिरंगी होऊ घातली आहे.

चिंचवड आणि कसबा पूर्ण ताकदीने लढण्याचा निर्णय `एमआयएम`च्या पश्चिम महाराष्ट्राच्या पिंपरी येथील कार्यालयात प्रदेश महासचिव तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अकील मुजावर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत काल (ता.२३) घेण्यात आला. एमआयएम रिंगणात उतरल्याचा फायदा युतीच्या ,तर फटका आघाडीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आघाडीच्या गोटात काहीसे चिंतेचे वातावरण पसरले आहे.