उद्योग नगरीत ‘आपण सारे अर्जुन!’ ही बौद्धिक कार्यशाळा

0
90

पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी म्हणून ओळखले जाते. या औद्योगिक नगरीमध्ये बौद्धिक उपक्रम तुलनेने कमी प्रमाणात होतात. यापार्श्वभूमीवर,किमया कम्युनिकेशन्स या संस्थेमार्फत ‘आपण सारे अर्जुन! या विषयावर घेण्यात आलेली कार्यशाळा लक्षवेधी ठरली. पेशाने ब्रँड कन्सल्टंट असलेल्या प्रा.जयंत शिंदे यांनी ही कार्यशाळा घेतली.

‘आपण सारे अर्जुन!’ या विषयाची मांडणी करताना प्रा.जयंत शिंदे म्हणतात, ‘जीवनाच्या विविध क्षेत्रात आपल्याला विविध भूमिका पार पाडाव्या लागतात. मात्र,अशा भूमिका पार पाडताना आपली मनोभूमिका महत्त्वाची असते. ती तयार करण्यासाठी सेल्फ कम्युनिकेशन बरोबरच,योग्य व्यक्तीबरोबर क्लास कम्युनिकेशन होणे आवश्यक असते. यासाठी ते महाभारतातील कृष्ण आणि अर्जुन यांचा दाखला देतात.

‘केवळ राज्य मिळविण्यासाठी आपल्याच माणसांशी युद्ध करण्यात काय अर्थ आहे?’
अर्जुनाला पडलेल्या या प्रश्नावर कृष्ण म्हणतो, ‘अर्जुना,युद्ध केवळ भूमीसाठी नाही लढले जात,तर भूमिकेसाठी लढावे लागते!’
कौरवांकडून पांडवांवर झालेल्या अन्यायाविरोधात तुला लढावेच लागेल!’
कृष्ण,अर्जुनाची मनोभूमिका तयार करतो,अर्जुन भूमिका घेतो आणि पांडव युद्ध जिंकतात.
यावर प्रा.जयंत शिंदे भाष्य करतात,की ‘युद्ध निम्मं मनात जिंकलं जातं आणि निम्मं थेट रणात जिंकलं जातं!’
महाभारतातील अर्जुनाचा दाखला देत,प्रा.शिंदे म्हणतात,एकाअर्थाने आपण सारेच अर्जुन आहोत!
आपण भूमिका घेतली पाहिजे आणि पार पाडली पाहिजे.
ब्रँड कन्सल्टंट म्हणून घेत असलेल्या पर्सनल सेशन्सचे विस्तारीत रूप म्हणजे ‘आपण सारे अर्जुन’ ही कार्यशाळा.
या अभिनव कार्यशाळेत विविध संस्थांचे प्रतिनिधी हजर होते.
या कार्यशाळेसाठी माधव पाटील व प्रमोदिनी लांडगे यांनी समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव पाटील यांनी केले.
उपस्थित मान्यवरांनी या बौद्धिक उपक्रमाचे स्वागत केले आणि
अशा कार्यशाळा घेण्यासाठी विविध संस्थांनी पुढे यावे,असे आवाहन केले.