उदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ !

0
235

समाजविघातक प्रवृत्तींच्या घरावरच नव्हे, तर या जिहादी विचारधारेवरही बुलडोझर फिरवावा लागणार ! – श्री. विनोद बंसल

पुणे, दि. ३० (पीसीबी) – राजस्थानमधील उदयपूर येथे कन्हैयालाल या हिंदूची जिहाद्यांनी केलेली नृशंस हत्या ही साधारण घटना नसून या देशाच्या सार्वभौमत्वासह येथील सभ्य समाज, संविधान आणि लोकशाही यांवरच आक्रमण आहे. या हत्येमागे केवळ दोन मुसलमान नसून त्यामागे त्यांचा ‘ब्रेन वॉश’ करणारे मदरसे, मौलवी आणि कट्टरवादी इस्लामी संघटना जबाबदार आहेत. हिंदूंच्या हत्या करणार्‍या अशा समाजविघातक प्रवृत्तींच्या फक्त घरावरच नव्हे, तर या जिहादी विचारधारेवरही ‘बुलडोझर’ फिरवावा लागणार आहे. सरकार, प्रशासन यंत्रणा या जिहाद्यांवर लगाम लावणार नसेल, तर हिंदू समाजाला दोषींवर कारवाई करण्यासाठी संघटित व्हावे लागेल, अशी चेतावणी ‘विश्व हिंदु परिषदे’चे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. विनोद बंसल यांनी केले.* हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘भारतात वाढत असलेली तालिबानी मानसिकता ?’* या विषयावरील ऑनलाईन विशेष संवादात ते बोलत होते.

आतंकवादाचे प्रशिक्षण देणारे मदरसे बंद करावेत ! – हिंदु जनजागृती समिती

उदयपूरमध्ये कन्हैयालाल यांच्या दुकानात ग्राहक बनून छुप्या पध्दतीने मुसलमानांनी त्यांची हत्या केली, कमलेश तिवारी यांचीही अशाच प्रकारे हत्या केली गेली. ही वीरता नसून नपुंसकता आहे. हिंदू समाज असा नाही. उलट संविधानिक रूपात आपली बाजू समोर मांडतो. जराही संयम न ठेवता सुरे घेऊन हत्या करणे, हा कुठला धर्म ? ‘आतंकवादाची सुरूवात मदरसांच्या मानसिकतेतून सुरू होते’, असे केरळचे राज्यपाल मोहम्मद आरिफ यांनी म्हटले आहे. ज्याप्रमाणे चीनने मदरशांमध्ये काय शिकवावे आणि काय नाही, यावर नियंत्रण ठेवले, त्याप्रमाणे भारत सरकारनेही केले पाहिजे. सरकारने मदरसांना निधी देणे बंद करावे, तसेच आतंकवादी प्रशिक्षण देणारे मदरसे बंद केले पाहिजेत. ‘एन्.आय.ए.(NIA)’ने केवळ हिंदूंच्या हत्येतील दोषींचा शोध न घेता ही हत्या करणार्‍यांना पैसा पुरवणारे, त्यांना आश्रय आणि प्रशिक्षण देणारे या सर्वांची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केली.

भारताला जिहाद्यांपासून मुक्त करण्यासाठी केंद्राने सैन्याला मोकळीक द्यावी ! – लष्कर-ए-हिंद

नुपूर शर्मा यांचे समर्थन करणारी पोस्ट सोशल मीडियावरून प्रसारित केल्यानंतर जेव्हा कन्हैयालाल यांना त्यांच्या जीवाला धोका असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी उदयपूर पोलिस ठाण्यांत तक्रार केली; मात्र राजकीय हेतूने प्रेरीत असलेल्या राजस्थान पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले. पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती, तर कन्हैयालाल यांची हत्या टळली असती. जिहादी मानसिकता बाळगणारे आतंकवादी फक्त हिंदूंचीच नव्हे, तर ख्रिस्ती, पारशी, यहुदी यांच्यासह जे ‘इस्लाम’ मानत नाहीत, त्या सर्वांचीच हत्या करतात. कट्टरतावादी मानसिकता संपविण्यासाठी आणि भारताला आतंकवाद्यांपासून मुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने पोलीस आणि सैन्य यांना मोकळीक द्यायला हवी, असे परखड मत ‘लष्कर-ए-हिंद’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. ईश्वरप्रसाद खंडेलवाल यांनी व्यक्त केले.