उदयपूर घटनेवर कंगना रणौत संतापली

0
240

नवी दिल्ली, दि. २९ (पीसीबी) – प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्या शिवणकाम व्यावसायिकाची राजसथामधील उदयपूर येथे हत्या करण्यात आली. या हत्येचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून हल्लेखोरांनी शिवणकाम व्यावसायिकाच्या दुकानात घुसून त्याच्यावर चाकू आणि तलवारीने वार केले आहेत. या घटनेनंतर देशभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. तर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने देखील या प्रकरणात संताप व्यक्त केला आहे.

कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कंगनाने शिवणकाम करणाऱ्या कन्हैयालालचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत कंगना म्हणाली, “नुपूर शर्मा यांना पाठिंबा दिल्यामुळे या निर्घृण हत्या करण्यात आली आणि जिहादींनी हा व्हिडीओ केला. ते लोक दुकानात जाणीवपूर्वक घुसले. त्यानंतर मोठमोठ्या घोषणा देऊ लागले. हे सगळं देवाच्या नावावर सुरु होतं.”