इंडो अथलेटिक सोसायटी तर्फे तुळापूर बलिदान स्मरण दिन राईड चे आयोजन, ५०० सायकलपटू न चा सहभाग

0
166

स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिन आणि जागतिक आरोग्य दिवस निमित्त इन्डो अथलेटिक्स सोसायटीतर्फे नाशिक फाटा ते तुळापूर अशी दरवर्षी घेण्यात येणारी ६० किलोमीटर सायकलिंग राईड चे आयोजन करण्यात येते सदर वर्ष आठवे वर्ष आहे , संपूर्ण महाराष्ट्रातून ५०० हून आधीक जणांनी सहभाग घेतला.

आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रामध्ये असणारी अग्रगण्य संस्था इन्डो अथलेटिक्स सोसायटी यांच्यामार्फत दरवर्षी हा उपक्रम राबवण्यात आला. सर्व सहभागी सायकल स्वार सोबत सकाळी 5 वाजता भक्ती शक्ती निगडी येथे जमले होते. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी प्रकाश शेडबाले , आयएएस चे गजानन खैरे, गणेश भुजबळ, अजित पाटील यांच्यातर्फे झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी इंडो अथलेटिक्स सोसायटी यांच्या सदस्य प्रज्ञा अजगर यांनी शंभू महाराजांवर एक पात्री प्रयोग सादर करा.

सर्व सभासद भक्ती शक्ती निगडी – नाशिक फाटा – चरोली फाटा – आळंदी – तुळापूर – वढू असा प्रवास करतात. पुणे पिंपरी चिंचवड,अहमदनगर, नारायणगाव, उदगीर, सोलापूर तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातून सायकल प्रेमींनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांना मान वंदना देण्यात आली.

नियोजना मध्ये इंडो ऍथलेटिक सोसायटी चा गिरीराज उमरीकर , अजित गोरे , अविनाश चौगुले, प्रशांत तायडे , मारुती विधाते यांनी सूत्रसंचालन केले.