आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे नव वर्ष उत्सव पर्यावरण सेवा उपक्रमाने साजरा

0
146
  • आर्ट ऑफ लिव्हिंग संत तुकाराम नगर केंद्र, दि येंजेल एंटरप्राईजेस व W.F.V संस्थे तर्फे गुढीपाडवा नव वर्ष उत्सव वेगळ्या प्रकारे साजरा केला गेला.

संत तुकाराम नगर येथे निविन वर्षाची सुरुवात मुक्या प्राण्यां साठी पाण्याचे पात्र (भांडी) वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून ह्या पर्यावरणासाठी सेवा उपक्रम केला गेला. सोबत येथील छत्रपती शिवाजी महाराज गोल मंडई मध्ये दुकानासमोर मोकळ्या जागेत गुढीपाड्यानिमित्त सुमधुर संगीत सत्संग आयोजित केला गेला सुमारे १०० शंभर पेक्षा जास्त लहान, तरुण आणि वयस्कर सर्व भाविकांनी ही सत्संग मध्ये नृत्य करत ह्याचा आस्वाद घेतला.

आर्ट ऑफ लिव्हिंग चे प्रशिक्षक व गायक अंबर पोकळे, सहगायक संजना चिक्से, नारायणी म्हेत्रे व तबला वादक तानाजी टिंगले ह्यांच्या गायन व वादक च्या जोरावर सर्व मंत्रमुग्ध होऊन नाचून जल्लोषात नवं वर्षाची सूरुवात केली. आसपास चे रस्ता वरून जाणारे लोक सुधा ह्याकडे आकर्षित झाले. नविन सात्विक ऊर्जा चां वर्षाव गुढिपाडवा च्या दिवशी येथे झाला.

रागिनी पाटील ह्यांनी गुरू पूजा करून सर्वांना गुरु आश्रिवाद आणि गहन ध्यानाचा अनुभव दिला. नेहमी सेवा कार्यामध्ये सक्रिय असणाऱ्या सकारात्मक ऊर्जा वाढवणारे स्प्रे परफ्यूम, अत्तर, मंत्र मशीन उत्पादक व श्री श्री तत्त्वा चे वितरक दि येंजेल एंटरप्राईजेस चे ही येथे ह्यावेळी उद्घाटन झाले. ह्यांनी १४ एप्रिल ला इथे होणाऱ्या आयुर्विदिक नाडी परिक्षा साठी ही सर्वांनी येण्याचे आवाहन केले आहे.

ह्याचे आयोजन आर्ट ऑफ लिव्हिंग संत तुकाराम नगर चे प्रशिक्षक सचिन नाईक व स्वयंसेवक रवी सकाटे, अमेय जोशी, (कृणाल ओसवाल -WFV ट्रस्ट), पूजा सक्सेना, राजीव सक्सेना, नंदिनी सिंग, प्रतिमा नाईक, गुरुनाथ सुतार, (छोटा सेवक कुश नाईक), साहिल दिंग्रा, कुसुम तिवारी, शंकर सोनार, गणेश धाळपे, योगिता धाळपे, अनिकेत जाधव ह्यांनी केले. येथील गुरू टेलर चे ही उत्तम सहकार्य लाभले.

२५ एप्रिल ला तरुणासाठी संत तुकाराम नगर येथे सुरू होणाऱ्या आर्ट ऑफ लव्हिंगचे तरुण विशेष हॅपिनेस प्रोग्रॅम साठी ही सर्वांना येण्यास आवाहन केले गेले. आर्ट ऑफ लिव्हिंग राज्य समन्वयक माणिक भोंग ह्यांनी ही हजेरी लावली ह्या सेवा कार्यासाठी स्वयंसेवकाची प्रशंसा केली आणि तरुणांनी अश्या कार्यात नेहमी पुढे यावे ह्यासाठी प्रोत्साहन दिले.