“आरोग्य आणि पर्यावरणाचे रक्षण” हे दोन्ही उद्देश साध्य करण्यासाठी जनजागृती पर्यायांचा विचार करणे हि काळाची गरज – शत्रुघ्न काटे

0
297

पिंपरी,दि.१६(पीसीबी) –  घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर “आपले शहर सायकल शहर” या उपक्रम अंतर्गत अल्प दरात दिल्या जाणाऱ्या सायकलचे नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.  आपले शहर सायकल शहर या उपक्रम अंतर्गत साधारण १५० पेक्षा जास्त सायकलींचे वाटप आज करण्यात आले.

यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी आपले विचार व्यक्त करतांना सांगितले कि , पिंपळे सौदागर हे स्मार्ट सिटी म्हणून झपाट्याने विकसित होत आहे.परिसरात अद्यावत मैदाने,उद्याने, रस्ते विकसित करण्यात आले आहेत तसेच रस्त्याच्या दुतर्फा सायकल ट्रक सुद्धा विकसित करण्यात आले आहे परंतु त्याचा वापर होताना मात्र दिसून येत नाही हे खेदजनक आहे. म्हणून “आपले शहर सायकल शहर” उपक्रमांतर्गत अल्प दरात सायकल उपलब्ध करून दिल्यास नक्कीच रस्त्यावर सायकलींचे प्रमाण वाढेले आणि परिणामी सायकल ट्रॅकचा वापर सुद्धा वाढेल.सायकलिंग मुळे शरीराला व्यायाम मिळण्याबरोबरच प्रदूषण रोखण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पडत असते.शहरातील प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढत असून याबाबत निव्वळ चर्चा करण्यापेक्षा ते रोखण्यासाठी सायकल विषयी जनजागृती करण्यास आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे . दररोज सकाळी सायकवरून फेरफटका मारण्याच्या सवयीमुळे तरुणाई सुद्धा सायकलकडे आकर्षित होत आहे. शाळा आणि कॉलेजात शिकणारे विद्यार्थी आणि तरुण हे मोठ्या हिरीरीने सायकलला प्राधान्य देताना दिसत आहे.