‘आप’चे कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांचे निलंबन रद्द

0
177

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – आम आदमी पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करण्याचा निर्णय आपचे राज्य प्रभारी हरिभाऊ राठोड यांनी घेतला आहे. आगामी महापालिका निवडणुका विचारात घेऊन हे निलंबन रद्द कऱण्यात आल्याचे समजते

गेली दहा वर्षे चेतन बेंद्रे आपमध्ये कार्यरत आहेत. शहरातील विविध नागरी समस्या,श्रमिक जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी ते प्रयत्नशिल असतात. त्यासाठी आंदोलने केली आहेत. विविध नागरी सुविधा, शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे मोठे काम गेली काही वर्षे ते निगडी,आकुर्डी भागात करत आहेत. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज जाणीवपूर्वक बाद केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले होते.