औरंगाबाद,दि.३०(पीसीबी) – एकनाथ शिंदे गटाचे मंत्री संदिपान भुमरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या समवेत शक्ती प्रदर्शनानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण संतनगरीत वारकऱ्यांसाठी बँकेची उभारणी केली जाईल, अशी मोठी घोषणा मंत्री संदीपान भुमरे यांनी केली. वारकऱ्यांना पैशासाठी कुणाही पुढे हात पसरवायची गरज पडू नये, यासाठी संदिपान भुमरे यांनी वारकऱ्यांसाठी विशेष बँकेची घोषणा केली आहे.
मंत्री तथा औरंगाबद जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी पैठण येथे संत स्नेहमिलन हा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला होता. या स्नेहमिलन कार्यक्रमाला कीर्तनकार, संत, भारुडकारांनी हजेरी लावली होती. यावेळी उपस्थित संत मंडळींनी आपल्या समस्या या संमेलनात मांडल्या. यावेळी मंत्री भुमरे यांनी त्यांच्या समस्या जाणून घेत पैठण येथील घाट, एकनाथी भागवत भवन बांधून देण्याचे जाहीर केले. या नंतर उपस्थित सर्व संतांचे मंत्री भुमरे यांनी पूजन करित त्यांचा सन्मान केला. अशा पद्धतीने संतांचं संमेल्लन पहिल्यांदाच महाराष्ट्रात भरवलं गेल्याचं सांगण्यात आले. हिवाळ्यातील उपकरणांवर 50% पर्यंत सूट मिळवा- गीझर, रूम हीटर, केटल आणि बरेच काही
यावेळी एका वारकऱ्याने वारकऱ्यांसाठी विशेष बँक स्थापन करावी, अशी मागणी मंत्री भुमरे यांच्याकडे केली. या मागणीची दखल घेत वारकऱ्यांना संबोधित करताना संदीपान भुमरे यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण संतनगरीत वारकऱ्यांसाठी विशेष बँकेची उभारणी केली जाईल, अशी माहिती दिली. वारकऱ्यांना पैशासाठी कुणापुढेही हात पसरवायची गरज पडू नये, यासाठी स्वतः संदिपान भुमरे यांनी वारकऱ्यांसाठी विशेष बँकेची घोषणा केली आहे.









































